प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनातालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न वाशिम दि.३१ (जिमाका) आत्मा कार्यालय,वाशिम येथे तालुका कृषि अधिकारी,वाशिम कार्यालयाच्या वतीने आज ३१ जानेवारी रोजी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.उद्घाटन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले. कार्यशाळेला मार्गदर्शन करताना श्री.तोटवार यांनी सूक्ष्म अन्नप्रक्रिया यावर आधारित उद्योग धंद्याचे महत्त्व तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांमध्ये शेतकरी शेतमजूर तरुण बेरोजगार यांना असलेली संधी व त्या संधीचे सोने करण्याकरीता या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थींनी लाभ घेण्याचे आवाहन केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्र,करडा येथील कार्यक्रम सहायक श्रीमती शुभांगी वाटाणे यांनी विविध प्रक्रिया उद्योगावर मार्गदर्शन केले.जिल्हा संसाधन व्यक्ती गोपाल मुठाळ यांनी योजना राबविण्याचे अनुषंगाने विविध तांत्रिक बाबी व योजनेच्या लाभार्थींनी क...