राज्यात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या नको महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सक्त निर्देश


▪️राज्यात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या नको

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सक्त निर्देश

▪️मंत्रालयातून जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हीसीव्दारे बैठकीत 
कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी बाबत सूचना

▪️१७ लाख शेतकऱ्यांच्या यादीनंतर दुसरी यादी पंधरा दिवसात

मुंबई, दि. २९ 
महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती योजना जाहीर केली असून, या योजनेची तळागाळापर्यंत प्रभावी अंमलबजावणी करावी. कर्जबाजारीपणामुळे यापुढे राज्यात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होता कामा नये, असे सक्त निर्देश राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. 
मंत्रालयातील महसूलमंत्र्यांच्या दालनात सहकार आणि महसूल विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे हेदेखील उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर