पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६ 🌾
🌾 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६ 🌾
✅ वाशिम जिल्ह्यात ई-केवायसी प्रक्रियेला गती!
शेतकरी बांधवांना योजनेचा लाभ जलद व पारदर्शक पद्धतीने मिळावा, यासाठी जिल्ह्यातील १,३४० 'आपले सरकार सेवा केंद्र' व ग्रामपंचायत केंद्र चालकांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले.
📌 प्रशिक्षणात ई-केवायसी प्रक्रिया, ऑनलाईन तक्रार नोंदणी, तांत्रिक अडचणींचे निराकरण तसेच सेवा केंद्रांचे प्रभावी व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
🌱 शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे
• ई-केवायसी प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे.
• जवळच्या 'आपले सरकार सेवा केंद्रा'त जाऊन ई-केवायसी पूर्ण करा.
• बँक खाते किंवा कर्जाच्या तपशिलात तफावत आढळल्यास सेवा केंद्रामार्फत त्वरित ऑनलाईन तक्रार नोंदवा आणि तहसील कार्यालयाशी संपर्क साधा.
योजनेचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.
#पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकर #शेतकरीकर्जमुक्तीयोजना२०२६ #ईकेवायसी #आपलेसरकारसेवाकेंद्र #वाशिम #शेतकरीकल्याण
Comments
Post a Comment