पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६
🌾 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६
वाशिम जिल्ह्यातील ५२ हजार ८८१ पात्र शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या प्रसिद्ध
राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६ अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील ६९४ गावांतील एकूण ५२ हजार ८८१ पात्र खातेदारांचा या यादीमध्ये समावेश आहे.
यामध्ये सेवा सहकारी संस्था (जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक) अंतर्गत २९ हजार ८५६ तसेच राष्ट्रीयीकृत, ग्रामीण व खासगी बँकांतील २३ हजार २५ पात्र खातेदारांचा समावेश आहे.
तालुकानिहाय पात्र लाभार्थी खातेदारांची संख्या :
🌾 वाशिम – १४,१६५
🌾 रिसोड – ११,८७९
🌾 मालेगाव – ५,६४७
🌾 मंगरुळपीर – ६,३०२
🌾 कारंजा – ७,४१४
🌾 मानोरा – ७,४७४
पात्र लाभार्थ्यांच्या गावनिहाय याद्या संबंधित गाव चावडी, ग्रामपंचायत कार्यालय, विकास सेवा संस्था कार्यालय तसेच संबंधित बँक शाखांमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पात्र शेतकऱ्यांनी यादीत आपले नाव तपासून पुढील प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी.
✅ योजनेचा लाभ मिळण्यासाठी अॅग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी असणे अनिवार्य आहे.
✅ विशिष्ट क्रमांक, आधार क्रमांक, कर्ज खात्याचे पासबुक व बँक खात्याचे पासबुक सोबत घेऊन जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र अथवा सीएससी केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करावे.
✅ आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीची मंजूर रक्कम थेट पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी कोणताही विलंब न करता आवश्यक कार्यवाही करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे. तसेच अॅग्रीस्टॅक नोंदणी व आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करून कर्जमुक्तीचा लाभ निश्चित करावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वाशिम एम. एस. लटपटे यांनी केले आहे.
#पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकरशेतकरीकर्जमुक्तीयोजना #कर्जमुक्ती२०२६ #वाशिम #शेतकरी #अॅग्रीस्टॅक #आधारप्रमाणीकरण #आपलेसरकारसेवाकेंद्र
Comments
Post a Comment