विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण मोहिमेची जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्याकडून कळंबा महाली येथे प्रत्यक्ष पाहणी



🗳️ प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोचण्याचा निर्धार!

विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण मोहिमेची जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्याकडून कळंबा महाली येथे प्रत्यक्ष पाहणी

घरभेटीद्वारे सुरू असलेल्या मतदार पडताळणी प्रक्रियेची जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधला. मतदार नंदाबाई सुरेश ठाकरे यांच्या घरी भेट देऊन गणनापत्र भरण्याची प्रक्रिया, माहिती संकलन आणि कागदपत्र पडताळणीची माहिती त्यांनी जाणून घेतली.

यावेळी नागरिकांना अचूक व अद्ययावत माहिती देऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. सक्षम आणि विश्वासार्ह मतदार यादी ही लोकशाहीचा मजबूत पाया असल्याने कोणताही पात्र मतदार वंचित राहू नये, यासाठी प्रत्येक घरापर्यंत पोहोचून काटेकोर पडताळणी करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

✅ अचूक माहिती द्या
✅ बीएलओंना सहकार्य करा
✅ लोकशाही अधिक सक्षम बनवा

#विशेषसखोलपुनरिक्षण #मतदारयादी #Washim #ElectionCommission #BLO #लोकशाही #जिल्हाधिकारी

Comments

Popular posts from this blog

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

पोकराच्या समूह सहाय्यकांचे प्रशिक्षण संपन्न.

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे