माविम जिल्हा कार्यालयाच्या जाळी तार कंपाऊंडचे भूमिपूजन

माविम जिल्हा कार्यालयाच्या जाळी तार कंपाऊंडचे भूमिपूजन
वाशिम दि.०८(जिमाका) महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वाशिम येथील जिल्हा कार्यालयाच्या ३ एकर परिसराकरिता माविमच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांच्या पुढाकारातून माविमच्या स्वनिधीतून मंजूर केलेल्या जाळीच्या तार कंपाऊंडचे भूमिपूजन आज ८ मे रोजी जिल्हा परिषद सदस्य सुधीर कव्हर यांच्या हस्ते करण्यात आले.या तार कंपाऊंडच्या कामावर २० लक्ष रुपये खर्च करण्यात येणार आहे. 
              या भूमिपूजन कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य गजानन भूरभुरे, शिवसेनेचे शहराध्यक्ष गजानन भादुर्गे,गजानन देशमुख,माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे,सहायक जिल्हा समन्वय अधिकारी समीर देशमुख, माविम कार्यालयाचे गौरव नंदनवार,कल्पना लोहकपुरे, राहुल मोकळे, पुरुषोत्तम हातोलकर, प्रदीप तायडे,प्रमोद गोरे, प्रदीप देवकर, विनय पडघान,जोस्ना पुरी, मीरा वाघमारे,वर्षा अंभोरे व संजय भादुर्गे यांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश