३१ मे रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साधणार लाभार्थ्यांशी संवाद
३१ मे रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साधणार लाभार्थ्यांशी संवाद
वाशिम दि.२७ (जिमाका) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे ३१ मे रोजी भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्ताने हिमाचल प्रदेशातील सिमला येथून जिल्ह्यातील केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधणार आहे. हा कार्यक्रम सकाळी १० वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह,वाशिम येथे आयोजित करण्यात आला आहे.
प्रधानमंत्री मोदी हे जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, स्वच्छ भारत मिशन, जल जीवन मिशन आणि अमृत योजना, प्रधानमंत्री स्व-निधी योजना, वन नेशन वन रेशन कार्ड,प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, आयुष्यमान भारत पीएम जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत हेल्थ व वेलनेस सेंटर आणि प्रधानमंत्री मुद्रा योजना आदि योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहे. यावेळी लोकप्रतिनिधी,स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंब,विविध विभागाचे अधिकारी,बँकेचे अधिकारी, विविध सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती देखील उपस्थित राहणार आहे.
Comments
Post a Comment