ब्राह्मणवाडा निर्वाचक गण पोटनिवडणूक जाहिरात प्रसारण प्रमाणपत्र देण्यासाठी समिती
ब्राह्मणवाडा
निर्वाचक गण पोटनिवडणूक
जाहिरात प्रसारण प्रमाणपत्र देण्यासाठी समिती
वाशिम, दि. 20 (जिमाका) : मालेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या
ब्राह्मणवाडा निर्वाचक गणाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने
जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष अथवा उमेदवारांनी सादर केलेल्या
जाहिरातीची ध्वनीफीत/चित्रफीत/सीडी आदी. साहित्याची तपासणी करून त्यांना जाहिरात
प्रसारणाचे विहित मुदतीत प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली
समिती गठीत करण्यात आली आहे.
११ मे पासून या निर्वाचक गणात आचारसंहिता
लागू झाली आहे. ५ जून रोजी मतदान व ६ जून रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीचा
निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी राजकीय
पक्ष अथवा उमेदवारांनी सादर केलेल्या जाहिरातीचे प्रसारण विहित मुदतीत करण्यासाठी
प्रमाणपत्र देण्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयात आलेले अर्ज व त्यासोबत असलेले
साहित्य तपासणी करण्याकरीता समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी हे या
समितीचे अध्यक्ष आहे. अपर जिल्हाधिकारी व निर्वाचक गण निवडणूक निर्णय अधिकारी, मालेगाव
हे सदस्य तर जिल्हा माहिती अधिकारी हे सदस्य सचिव आहेत.
*******
Comments
Post a Comment