शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी आतापर्यंत ४८२ कोटी रुपये पीक कर्ज वाटप
शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी आतापर्यंत ४८२ कोटी रुपये पीक कर्ज वाटप
१ लाख ८ हजार ७५० शेतकऱ्यांना १०५० कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट
वाशिम दि ६ (जिमाका) जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. शेतकऱ्यांना चांगल्याप्रकारे शेती करता यावी आणि त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढुन जीवनमान उंचावावे यासाठी शासन दरवर्षी बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात पीक कर्ज उपलब्ध करून देते.
यावर्षीच्या सन २०२२ करीता खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील १ लाख ८ हजार ७५० शेतकऱ्यांना १०५० कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे.५ मे २०२२ पर्यंत जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयकृत, सहकारी आणि खाजगी बँकांच्या शाखांनी जिल्ह्यातील ५० हजार ३७१ शेतकऱ्यांना ४८२ कोटी रुपये पीक कर्ज उपलब्ध करून दिले आहे.
मागीलवर्षीच्या तुलनेत काल ५ मेपर्यंत ६७६१ शेतकऱ्यांना ७ कोटी ८४ लक्ष रुपये जास्त पीक कर्ज उपलब्ध करून दिले आहे.खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाला दरवर्षी १ एप्रिलपासून सुरुवात करण्यात येते.मागील आर्थिक वर्षात ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्जाचा भरणा संबधित बँकेकडे केला आहे, अशा शेतकऱ्यांना बँक चालू वर्षी पीक कर्ज उपलब्ध करून देते.अशी माहिती जिल्हा अग्रणी बँकचे जिल्हा व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर यांनी दिली.
Comments
Post a Comment