बँकेत कागदपत्रे दाखवून केवायसी करा
- Get link
- X
- Other Apps
बँकेत कागदपत्रे दाखवून केवायसी करा
वाशिम, दि. 11 (जिमाका) : बँक व्यवहार न केल्यामुळे काही बँक खाती तात्पुरत्या स्वरुपात बंद आहे. अशा खातेदारांनी संबंधित बँकेत आपले आधारकार्ड व वैयक्तीक ओळखपत्राची कागदपत्रे सोबत घेवून जाऊन केवायसी करावी. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात बंद असलेली बँकखाते पुन्हा इतर विविध बँकांशी संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी क्रीयाशील होण्यास मदत होईल.
10 रुपयांची नाणी चलनात (व्यवहारासाठी पात्र)
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार 10 रुपयांचे नाणे हे चलनात आहे. ग्राहकांनी व व्यापाऱ्यांनी 10 रुपयांच्या नाण्याची व्यवहारात देवाण-घेवाण करावी. व्यवहार करतांना 10 रुपयांचे नाणे घेण्यास कुणीही नकार देवू नये. 10 रुपयांचे नाणे हे भारतीय व्यवहारातील चलन आहे.
*******- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment