उद्योजकतेला चालना देण्यासाठी उद्यमिता यात्रा 31 मे ते 2 जून दरम्यान जिल्हयात उद्योजक बनू इछिणाऱ्या युवक-युवतींनी लाभ घ्यावा- सुनंदा बजाज यांचे आवाहन
- Get link
- X
- Other Apps
उद्योजकतेला चालना देण्यासाठी
उद्यमिता यात्रा 31 मे ते 2 जून दरम्यान जिल्हयात
उद्योजक बनू इछिणाऱ्या युवक-युवतींनी लाभ घ्यावा
- सुनंदा बजाज यांचे आवाहन
वाशिम, दि. 25 (जिमाका) : लघू व सुक्ष्म व्यवसाय, कौशल्य व्यवसाय आणि तरुणांमधील उद्योजकतेला चालना देण्यासाठी राज्यव्यापी उद्यमिता यात्रेचे आयोजन कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत करण्यात आले आहे. ही यात्रा राज्यातील प्रत्येक जिल्हयात तीन दिवस युवक-युवतींना विनामुल्य उद्योजकता प्रशिक्षण देणार आहे. वाशिम येथे उद्यमिता यात्रेचे आगमन 31 मे रोजी होणार असून ही यात्रा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, वाशिम येथील सभागृहात 31 मे, 1 व 2 जून या तीन दिवशीय उद्योजकतेबाबतचे विविध प्रकारचे प्रशिक्षण देणार आहे. तरी जिल्हयातील उद्योजक बनू इच्छिणाऱ्या युवक-युवतींनी या यात्रेचा लाभ घ्यावा. असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.
या प्रशिक्षणाअंतर्गत 31 मे रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजता दरम्यान उदघाटन होणार आहे. दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत डेव्हलपींग बिझिनेस आयडिया या विषयी, दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत व्हाय बिझिनेस फेल यावर सविस्तर मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 1 जून रोजी आर्थिक साक्षरता व्यवसायाच्या नियोजनाचे महत्व आणि व्यवसायाचे नियोजन कसे विकसीत करावे याविषयी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 2 जून रोजी प्रेझेंटेशन ऑफ बिझिनेस आयडियाज, फंडिग ॲन्ड लिगल कंप्लायंसेस फॉर बिझिनेस यावर विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार असून प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार आहे.
या उद्यमिता यात्रेअंतर्गत मोफत उद्योजकता प्रशिक्षणाचा लाभ जिल्हयातील उद्योग व्यवसाय करु इच्छिणाऱ्या युवक-युवती, कौशल्यधारक उमेदवार व विविध बचतगटातील सदस्यांनी घ्यावा. या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी https://forms.gle/
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment