कीसान क्रेडिट कार्ड (पीक कर्ज) साठी शेतकऱ्यांनी बँकेशी संपर्क साधावा
- Get link
- X
- Other Apps
कीसान क्रेडिट कार्ड (पीक कर्ज) साठी
शेतकऱ्यांनी बँकेशी संपर्क साधावा
वाशिम, दि. 11 (जिमाका) : शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामात शेतीसाठी बियाणे व खते घेण्यासाठी दरवर्षी शासन बँकामार्फत शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करुन देते. पात्र शेतकरी हा पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता जिल्हा प्रशासन घेते. पीक कर्ज हे कीसान क्रेडीट कार्ड आहे. कीसान क्रेडीट कार्ड अर्थात पीक कर्जापासून वंचित असलेल्या विविध क्षेत्रातील शेतकऱ्यांना हे कीसान क्रेडीट कार्ड उपलब्ध करुन देण्यासाठी गावपातळीवर 24 एप्रिल रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसभेला ज्या बँकांच्या कार्यक्षेत्रात जे गावे येतात त्या बँकेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
कीसान क्रेडीट कार्ड काढण्याचा संबंध हा संबंधित ग्रामपंचायतचे सरपंच आणि सचिव यांचेशी नसून ज्या बँक शाखेच्या कार्यक्षेत्रात जे गांव येते त्या बँक शाखेशी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा. कीसान क्रेडीट कार्ड काढण्यासाठी शेतकऱ्यांनी सातबारा, आठ-अ आणि आधारकार्ड घेवून संबंधित बँकेशी संपर्क साधावा. बँकेकडून शेतकऱ्यांना कीसान क्रेडीट कार्ड 5 दिवसाच्या आतच उपलब्ध होणार आहे.
शेतीसाठी खरीप व रब्बी हंगामात मिळणारे पीक कर्ज हेच कीसान क्रेडीट कार्ड आहे. कीसान क्रेडीट कार्ड हे पीक कर्ज खात्याशी संलग्न आहे. शेतकऱ्यांना मिळणारे पीक कर्ज हे कीसान क्रेडीट कार्डमध्ये जमा असते. ते बँकेच्या बचत खात्यात वळती न करता कीसान क्रेडिट कार्डचा वापर एटीएमसारखा किंवा क्रेडीट कार्डसारखा कोणताही व्यवहार रोखीने न करता तो पैसा कीसान क्रेडीट कार्डच्या माध्यमातून खर्च करता येतो. तेव्हा जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत कीसान क्रेडीट कार्ड काढले नसतील त्यांनी आपले गाव ज्या बँक शाखेशी जोडले आहे त्या बँक शाखेशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर यांनी केले आहे.
*******- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment