दामिनी’ देणार वीज पडण्याची सूचना दामिनी ॲपचा वापर करून वीजेपासून संरक्षण करण्याचे आवाहन

‘दामिनी’ देणार वीज पडण्याची सूचना

दामिनी ॲपचा वापर करून वीजेपासून संरक्षण करण्याचे आवाहन
वाशिम,दि.२५ (जिमाका)  मान्सून कालावधीत विशेषतः जुन व जुलै या महिन्यात विज पडून जिवीतहानी होत असते. विज पडुन जिवीत हानी होऊ नये, या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन पृथ्वी मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांनी “दामिनी ” ॲप तयार केले आहे. हे दामिनी ॲप विज पडण्याची सूचना देणार आहे. त्यामुळे नागरिकांनी वीज पडून होणाऱ्या धोक्यापासून वाचण्यासाठी ॲपचा वापर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
     दामिनी अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून सर्व नागरिकांना तसेच शासकीय यंत्रणा,शासकीय अधिकारी ,कर्मचारी,नागरिक, क्षेत्रीय अधिकारी, मंडळ अधिकारी, गाव स्तरावरील सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक, कोतवाल,आशा वर्कर,अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना दामिनी अॅप डाऊनलोड करुन त्याचा वापर करणेबाबत प्रवृत्त करावे. तसेच या अॅपचे GPS लोकेशनने काम करीत असून विज पडण्याच्या १५ मिनिटापूर्वी सदरच्या अॅपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते.अॅपमध्ये आपले सभोवताल विज पडत असल्यास सदरच्या ठिकाणापासुन सुरक्षीत स्थळी जावे. तसेच त्यावेळी झाडाचा आश्रय घेऊ नये.
          गावातील सर्व स्थानिक, शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांनी दामिनी ॲप डाऊनलोड करुन त्यामध्ये प्राप्त होणाऱ्या अलर्टनुसार आवश्यक पूर्वसुचना गावातील सर्व नागरिकांना देऊन होणारी जीवितहानी टाळावी,असे आवाहन जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी केले आहे .

                                                                  ******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे