मतदार याद्या अधिक अचूक करण्यासाठी विशेष सखोल पुनरिक्षणाला गती द्यावी 📌 जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे निर्देश;


🗳️ मतदार याद्या अधिक अचूक करण्यासाठी विशेष सखोल पुनरिक्षणाला गती द्यावी 
📌 जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे निर्देश; 

वाशिम, कारंजा व रिसोड येथे एसआयआर कामकाजाची पाहणी

मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि दोषविरहित करण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगामार्फत राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेच्या कामकाजाची जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी वाशिम, कारंजा आणि रिसोड येथे प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी इन्युमरेशन फॉर्म (गणना प्रपत्र) डाउनलोड, छपाई, वितरण, संकलन तसेच मतदार नोंदींच्या पडताळणीच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि पर्यवेक्षकांनी नागरिकांशी अधिक प्रभावी संवाद साधून गणना प्रपत्र भरण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

📍 जिल्ह्यातील १० लाख २० हजार २०८ मतदारांची होणार प्रत्यक्ष पडताळणी
📍 १,१०० मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घरोघरी देणार भेट
📍 दुबार नावे कमी करणे, मृत मतदारांची नावे वगळणे आणि नवीन पात्र मतदारांची अचूक नोंदणी हे मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट

मतदारांना पूर्वभरित गणना प्रपत्र उपलब्ध करून देण्यात येणार असून आवश्यक माहिती व कागदपत्रांसह मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत कायम राहावे यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.

यावेळी प्रभारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी विरेंद्र जाधव, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, कैलास देवरे, तहसीलदार निलेश पळसकर, प्रतिक्षा तेजणकर, रवी महाले , आदींची उपस्थिती. 

✅ अचूक मतदार यादी ही सक्षम लोकशाहीची पायाभूत गरज आहे.

🤝 मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेत सर्व संबंधितांनी सक्रिय सहभाग नोंदवून प्रशासनाला सहकार्य करावे.

#Washim #SIR2026 #VoterListRevision #ElectionCommission #DistrictAdministration #WashimNews #Democracy #VoterVerification #SpecialIntensiveRevision

Comments

Popular posts from this blog

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

पोकराच्या समूह सहाय्यकांचे प्रशिक्षण संपन्न.