राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना शासकीय पडीक जमिनी केवळ १ रुपये दराने भाडेपट्ट्याने मिळणार!


राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना 
शासकीय पडीक जमिनी केवळ १ रुपये दराने भाडेपट्ट्याने मिळणार!

ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून ‘राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना’ सुरू केली आहे.

या योजनेअंतर्गत राज्यातील शासकीय पडीक जमिनी महिला बचत गट, ग्रामसंघ आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांच्या गटांना केवळ १ रुपया नाममात्र दराने भाडेपट्ट्याने दिल्या जाणार आहेत. यामध्ये जनावरांच्या चारा लागवडीसाठी ३ वर्षे तर बांबू लागवडीसाठी १० वर्षांच्या कालावधीकरिता जमीन उपलब्ध करून दिली जाईल. या योजनेत १० महिला सदस्य असलेल्या बचत गटांना १ हेक्टर, २० सदस्य असलेल्या संस्थांना २ हेक्टर, तर ग्रामसंघाला ५ हेक्टरपर्यंत जमीन मिळू शकते. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या जमिनींची निश्चिती केली जाणार असून, यामुळे महिलांना रोजगाराच्या शाश्वत संधी मिळण्यासोबतच शासकीय जमिनींचे अतिक्रमणापासून संरक्षणही होणार आहे.

#RevenueDepartment #MaharashtraGovernment #RajmataJijauMahilaSakshamikaranYojana #WomenEmpowerment #WomenSelfHelpGroups #GovernmentLand #LandOnLease #OneRupeeLease #RuralDevelopment

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर