देशातील प्रत्येक कार्यस्थळ महिलांसाठी सुरक्षित, सन्मानजनक आणि लैंगिक छळमुक्त करण्याच्या दिशेने राष्ट्रीय महिला आयोगाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.


📍 नवी दिल्ली
देशातील प्रत्येक कार्यस्थळ महिलांसाठी सुरक्षित, सन्मानजनक आणि लैंगिक छळमुक्त करण्याच्या दिशेने राष्ट्रीय महिला आयोगाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कामाच्या ठिकाणी महिलांवरील लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई आणि निवारण कायदा-२०१३ देशात प्रभावीपणे राबविण्यासाठी १८ महत्त्वाच्या उपाययोजनांचा कृती आराखडा कार्यक्रम निश्चित करून देण्यात आला आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाने सर्व राज्यांचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना पाठविलेल्या निर्देशांमध्ये शेवटच्या स्तरापर्यंत जबाबदारी निश्चित करण्यावर भर देण्यात आला आहे. महिलांना सन्मान आणि उपजीविका यामध्ये निवड करण्याची वेळ येऊ नये. प्रत्येक कार्यस्थळ सुरक्षितता, समानता आणि सन्मानाचे केंद्र बनले पाहिजे असे आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी स्पष्ट केले आहे.

सविस्तर वृत्त- https://mahasamvad.in/204385/

 #पॉशकायदा
#राष्ट्रीयमहिलाआयोग

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर