पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा !
🌾 पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ पारदर्शक, सुलभ आणि गतिमान पद्धतीने मिळावा, यासाठी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी पत्रकार परिषदेत केले. राज्य शासनाने जाहीर केलेल्या या योजनेत कर्जमाफी, एकवेळ समझोता योजना (ओटीएस) आणि प्रोत्साहनपर लाभ या तीन घटकांचा समावेश आहे. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित करण्यात आलेले पीक कर्ज तसेच पुनर्गठन व फेरपुनर्गठन केलेल्या पीक कर्जाचाही यामध्ये समावेश आहे. पात्र शेतकऱ्यांना रुपये २ लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार असून, दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना एकवेळ समझोता योजनेचा लाभ उपलब्ध आहे. तसेच विहित अटींची पूर्तता करणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये ५० हजारांपर्यंत प्र...