जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा वाशिम, दि. 01 (जिमाका) : 21 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणाऱ्या जागतिक पुरुष नसबंदी पंधरवाडा निमित्ताने आज 1 डिसेंबर रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. धर्मपाल खेळकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. डॉ. अविनाश झरे आणि डॉ. अनिल कावरखे यांनी दोन रुग्णांची पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करुन हा पंधरवाडा साजरा केले. यावेळी अतिरीक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. यादव, डॉ. अविनाश झरे, डॉ. अनिल कावरखे, डॉ. दुगाने, डॉ. जाधव, डॉ. हेबांडे, डॉ. शेख, डॉ. गुंजकर तसेच बाहयसंपर्क वैद्यकीय अधिकारी डॉ. हेडाऊ, डॉ. राठोड यांची उपस्थिती होती. पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया कार्यक्रमात मान्यवरांनी पुरुष नसबंदीबाबत मार्गदर्शन केले. पुरुष नसबंदी पंधरवाडयामध्ये सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल पवार, निलेश गागेराव यांनी पुरुष नसबंदी शस्त्रक्रीया केली. तसेच समाजातील इतर पुरुषांनी स्वेच्छेने नसबंदीसाठी पुढाकार घ्यावा. असे आवाहन यावेळी केले. कार्यक्रमाला जयश्री भालेराव, मिना संगेवार, ॲड. राधा नरवलिया, ललिता घुगे, श...
एकांबा ग्रामपंचायत तपासनी करावी खुप भष्टाचार आहे गरीब मराठी मंजुदार याना कोणती योजना मिळत नाही चार वर्षा पासुन विहीर आनुदान मिळाली नाही
ReplyDelete