जिल्हाधिकारी कार्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन


वाशिम, दि. ०३ : थोर स्वातंत्र्य सेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याहस्ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल खंडागळे, मंगरूळपीरचे उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बालासाहेब बोराडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यान्वित