साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
वाशिम, दि. ०१ : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात
विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी
यांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून
अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी
अपर जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, रोहयोचे
उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल
खंडागळे, मंगरूळपीरचे उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, जिल्हा नियोजन अधिकारी
सुरेंद्र गवळी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित
होते.
Comments
Post a Comment