वाशिम जिल्ह्यात ८२३ कोटी ४२ लक्ष रुपये पीक कर्जाचे वितरण
· १ लक्ष ६ हजार शेतकऱ्यांना मिळाला लाभ · पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना यश · खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना मिळाला आधार वाशिम , दि . ३१ : गतवर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेती उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने बळीराजाचे अर्थकारण बिघडले होते. आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांना सन २०१६ च्या खरीप हंगामात मशागत, पेरणीकरिता मदतीचा हात देण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने घेतला होता. पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, राहुल द्विवेदी यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ८२३ कोटी ४२ लक्ष रुपये पिक कर्ज स्वरुपात वितरीत करण्यात आले आहेत. यंदा चांगला पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने पेरणी खालील क्षेत्र वाढ ...