Posts

अमरावती विभागातून अभ्यासपूर्ण अभिप्राय व सूचना प्राप्त –अपर मुख्यसचिव व्ही. राधाभरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी टास्क फोर्स दीर्घकालीन मसुदा तयार करणार

Image
अमरावती विभागातून अभ्यासपूर्ण अभिप्राय व सूचना प्राप्त     –अपर मुख्यसचिव व्ही. राधा भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी टास्क फोर्स दीर्घकालीन मसुदा तयार करणार   अमरावती, दि. 17 (जिमाका) : भरती प्रक्रिया सुधारणा करण्यासंदर्भात अमरावती विभागातील हितधारकांकडून अभ्यासपूर्ण अभिप्राय व सूचना प्राप्त झाल्या आहेत. राज्यातील सर्व महसुली विभागातून प्राप्त सूचनांचा सखोल अभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह (एमपीएससी) अन्य परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक,परिक्षार्थीस्नेही व सुटसूटित करण्यासाठी निर्धारीत कालावधीत उच्चस्तरीय स्टास्क फोर्स दीर्घकालीन मसुदा तयार करेल,अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्यसचिव तथा उच्च स्तरीय टास्क फोर्सच्या अध्यक्ष व्ही. राधा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.               श्रीमती राधा यांच्या अध्यक्षतेखालील भरती प्रक्रिया सुधारणेसाठी नियुक्त उच्चस्तरीय टास्क फोर्सने पहिल्या सत्रात येथील नियोजन भवनात विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, लोकप्रतिनिधी व नागरिक आ...

🌺 गणेशोत्सवातून शासकीय योजनांचा 'लोकसंवाद' उत्साहात सुरुवात📍 मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळात दिली आरोग्य विभागाच्या विविध योजनांची माहिती

Image
🌺 गणेशोत्सवातून शासकीय योजनांचा 'लोकसंवाद' उत्साहात सुरुवात 📍 मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळात दिली आरोग्य विभागाच्या विविध योजनांची माहिती वाशिम, दि. १८ सप्टेंबर (जिमाका) : गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला असून, या उत्सवाच्या माध्यमातून शासनाचे धोरणात्मक निर्णय आणि विविध महत्त्वाच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ‘लोकसंवाद-२०२६’ हा विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या सहकार्याने जिल्हा माहिती कार्यालय, वाशिमच्या वतीने विविध विषयांवरील शासकीय योजना, उपक्रम आणि निर्णयांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळ, मंत्री पार्क, वाशिम येथे आरोग्य विभागाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी स्वप्नील चव्हाण यांनी नागरिकांशी संवाद साधत आरोग्य विभागाच्या विविध योजना, उपक्रम आणि उपलब्ध शासकीय सुविधांची माहिती दिली. गणेशोत्सव...

🗳️ मतदार नोंदणीसाठी १९, २०, २६ व २७ सप्टेंबर रोजी विशेष शिबिरांचे आयोजन

Image
🗳️ मतदार नोंदणीसाठी १९, २०, २६ व २७ सप्टेंबर रोजी विशेष शिबिरांचे आयोजन 📍 वाशिम, दि. १७ सप्टेंबर (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-२०२६ अंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याची कार्यवाही सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गत नागरिकांना नवीन मतदार म्हणून नोंदणी करणे, मतदार यादीतील विद्यमान नोंदींमध्ये दुरुस्ती करणे तसेच नाव वगळणीसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्‍याकरीता नमुना ६, ७ व ८ पुरेशा प्रमाणात स्‍थानिक मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी यांच्‍याकडे उपलब्‍ध करुन देण्‍यात येत आहेत. 📅 विशेष मतदार नोंदणी शिबिरे राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर दि. १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. ⏰ या दिवशी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत नियुक्त मतदान केंद्रांवर उपस्थित राहतील. 📝 विशेष शिबिरांमध्ये नागरिकांना पुढील सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील : 🔹 पात्र नागरिकांची नवीन मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी अर्ज स्वीका...

🇮🇳 मंगरुळपीर पंचायत समितीत ‘सेवा संकल्प अभियानाचा’ शुभारंभ🤝 खासदार संजय देशमुख यांच्या उपस्थितीत अभियानाला सुरुवात

Image
🇮🇳 मंगरुळपीर पंचायत समितीत ‘सेवा संकल्प अभियानाचा’ शुभारंभ 🤝 खासदार संजय देशमुख यांच्या उपस्थितीत अभियानाला सुरुवात 📍 वाशिम, दि. १७ सप्टेंबर (जिमाका) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक राजकीय कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नागरिकांना उत्तम दर्जाची सेवा देण्यात येणार असून, मंगरुळपीर पंचायत समिती येथे आज शपथ घेऊन अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ झाला. 🏡 मंगरुळपीर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतींमध्येही सेवा संकल्प अभियानाच्या अनुषंगाने शपथ घेण्यात आली. नागरिकांना विविध सेवा सुलभतेने आणि निःशुल्क उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. 👥 याप्रसंगी मंगरुळपीर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सारीका कारले आणि विस्तार अधिकारी वाढणकर यांच्या...

पात्र अतिक्रमणधारकांना नियमानुसार पट्टे वाटप

Image
पात्र अतिक्रमणधारकांना नियमानुसार पट्टे वाटप  १ जानेवारी २०११ पूर्वी रहिवास क्षेत्रात किंवा शासकीय जागेवर अतिक्रमण करून वास्तव्यास असलेल्या पात्र नागरिकांना शासनाच्या प्रचलित निर्णय व निकषांनुसार पट्टे देण्याची कार्यवाही ‘सेवा संकल्प अभियाना’तून करावी, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. अभियानातील विविध उपक्रमांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्थानिक समाजमाध्यम प्रभावकांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. #अतिक्रमणधारक #पात्रअतिक्रमणधारक #पट्टेवाटप #Maharashtra #MaharashtraGovernment #RevenueDepartment #SevaSankalpAbhiyan #SevaSankalp #Encroachment