अनसिंग येथे पोहचली विकसीत भारत संकल्प यात्रा ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अनसिंग येथे पोहचली विकसीत भारत संकल्प यात्रा ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद वाशिम, दि. 28 (जिमाका) : भारताला सन 2047 पर्यंत विकसीत राष्ट्र म्हणून पुढे यायचे आहे. यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला आहे. ज्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या योजनांचा अद्यापही लाभ मिळालेला नाही, त्यांना योजनांची माहिती होवून ते लाभ घेण्यास प्रवृत्त होण्यासाठी प्रधानमंत्री मोदी यांच्या संकल्पनेतून विकसीत भारत संकल्प यात्रा देशभर काढण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आज 28 डिसेंबर रोजी वाशिम तालुक्यातील अनसिंग येथे गांधी चौकात विकसीत भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातून केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या माहितीसह लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांच्या मुलाखती दाखविण्यात आल्या. अनसिंगचे सरपंच संतोष खंडारे, यात्रा समन्वयक चंद्रकांत ठाकरे यांनी या यात्रेचे स्वागत केले. यावेळी या यात्रेच्या माध्यमातून उपस्थित नागरीकांना केंद्र ...