प्रत्येक उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर काळजीपूर्वक लक्ष ठेवा - नरेंदर सिंग
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ · कारंजा येथील निवडणूक खर्च कक्षाला भेट वाशिम , दि. २९ : निवडणूक खर्च संनियंत्रणासाठी विविध पथकांनी आपल्या विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक उमेदवाराच्या निवडणूक खर्चावर काळजीपूर्वक लक्ष ठेवावे. तसेच या खर्चाची नोंद त्यांच्या शॅडो रजिस्टरमध्ये करावी, अशा सूचना निवडणूक खर्च निरीक्षक नरेंदर सिंग यांनी आज दिल्या. कारंजा विधानसभा मतदारसंघासाठी कारंजा उपकोषागार कार्यालयात सुरु करण्यात आलेल्या निवडणूक खर्च संनियंत्रण कक्षाला भेट देवून तेथील अधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी कारंजा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनुप खांडे , सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार धीरज मांजरे, जिल्हा कोषागार अधिकारी तथा निवडणूक खर्च संनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी चंद्रकांत खारोडे, निवडणूक खर्च निरीक्षक श्री. सिंग यांचे संपर्क अधिकारी संतोष कंदेवार यांची उपस्थिती होती. यावेळी श्री. सिंग म्हणाले , विधानसभा निवडणुकीत कोणत्याही उमेदवारांकडून मतदारांना कोणत्याही प्रकारचे प्रलोभन दाखविले जावू नये...