आणीबाणी ही देशासाठी काळी रात्र — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


*आणीबाणी ही देशासाठी काळी रात्र*
      — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १६ : देशात लावण्यात आलेली आणीबाणी ही आपल्या देशासाठी काळी रात्र होती. त्यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान गुंडाळून ठेवले. मात्र ही घटना देशाच्या प्रत्येक नागरिकांस  माहिती होणे आवश्यक असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "इमर्जेन्सी" या चित्रपटाच्या विशेष शो दरम्यान केले.

इमर्जेन्सी या चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन बीकेसीतील पीव्हीआर येथे करण्यात आले. यावेळी चित्रपटाच्या नायिका कंगना राणावत, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, चित्रपटाची संपूर्ण टीम आणि प्रेक्षक उपस्थित होते. 

माजी प्रधानमंत्री स्वर्गीय इंदिरा गांधी ह्या सर्वांसाठी महान आहे असे सांगून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की आणीबाणी हा एक असा क्षण आहे ज्यात प्रत्येक मनुष्याचे अधिकार काढून घेण्यात आले होते. या लोकशाहीवर आलेल्या संकटाची माहिती जोपर्यंत देशाच्या नागरिकांना सांगणार नाही, तोपर्यंत त्यांना देशाची किंमत कळणार नाही, असेही प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.


या चित्रपटाबाबत बोलताना मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, अभिनेत्री कंगना राणावत यांनी स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी भूमिका अतिशय उत्तम रंगवली आहे. या चित्रपटात एक ऐतिहासिक मागोवा घेण्यात आला आहे. यातून एक नेत्याचा प्रवासही दर्शवला असल्याचेही त्यांनी सांगितले.
000

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर