शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक चांगले उत्पादन घ्यावे ऍड निलेश हेलोंडेचिया पिक म्हणजे कृषी विकासाचा नवा अध्यायचिया व संत्रा पिकाच्या प्रगतीची पाहणी
- Get link
- X
- Other Apps
शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक चांगले उत्पादन घ्यावे
ऍड निलेश हेलोंडे
चिया पिक म्हणजे कृषी विकासाचा नवा अध्याय
चिया व संत्रा पिकाच्या प्रगतीची पाहणी
वाशिम,दि.१० जानेवारी (जिमाका)
शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक चांगले उत्पादन घ्यावे. सरकारच्या विविध योजना आणि अनुदानाचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आत्मनिर्भर होण्याचे प्रयत्न करावेत.”असे प्रतिपादन
कै.वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ऍड.निलेश हेलोंडे यांनी केले. आज दि.१० जानेवारी रोजी मालेगाव येथील प्रसिद्ध शेतकरी नीरज पांडे यांच्या शेताला भेट देऊन संत्रा व चिया पिकाच्या वाढीची पाहणी केली यावेळी ते बोलत होते. संत्रा पिकाची गुणवत्ता आणि उत्पादन व्यवस्थापन यासंबंधी त्यांनी सखोल निरीक्षण केले आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी तालुका कृषी अधिकारी अतुल जावळे, मालेगाव तालुका कषी अधिकारी कैलास देवकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अमरावती निलेश ठोंबरे,कृषी पर्यवेक्षक धनंजय शितोळे आदी उपस्थित होते.
शेतात आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या वापरामुळे संत्रा पिकात झालेल्या सकारात्मक बदलांबद्दल ऍड.श्री.हेलोंडे यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी शेतकरी नीरज पांडे यांच्या परिश्रमाची आणि नाविन्यपूर्ण शेती तंत्रज्ञानाच्या वापराची व सेंद्रिय पद्धतीने करत असलेल्या शेत पिकाची पाहणी करत प्रशंसा केली.
संवाद आणि शिफारसी
भेटीदरम्यान श्री.हेलोंडे यांनी पाण्याचे नियोजन, पीक संरक्षण, खत व्यवस्थापन आणि उत्पादन वाढीसाठी आवश्यक तंत्रज्ञान याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच संत्रा पिकाच्या निर्यात क्षमतेबाबतही चर्चा करण्यात आली.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन
हेलोंडे यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक चांगले उत्पादन घ्यावे. सरकारच्या विविध योजना आणि अनुदानाचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आत्मनिर्भर होण्याचे प्रयत्न करावेत.”
नीरज पांडे यांनीही या भेटीमुळे समाधान व्यक्त करताना सांगितले की, “अध्यक्ष निलेश हेलोंडे यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला आणखी प्रोत्साहन मिळाले आहे. भविष्यातही आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतीतील गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न करू.”
शेतकऱ्यांच्या हितासाठी अशा प्रकारच्या पाहण्या आणि मार्गदर्शन कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना नवी दिशा मिळत असल्याचेही कृषी तज्ञांनी नमूद केले.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment