वाशिम जिल्ह्यात चियाची लागवड : शेतीच्या नव्या अध्यायाला सुरुवातचिया लागवडीत वाशिम जिल्हा अग्रेसर



वाशिम जिल्ह्यात चियाची लागवड : शेतीच्या नव्या अध्यायाला सुरुवात

चिया लागवडीत वाशिम जिल्हा अग्रेसर

                वाशिम जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पिकांपासून वेगळ्या आधुनिक पिकांकडे वळत आहेत. यामध्ये चिया हे पीक अल्पावधीतच शेतकऱ्यांचे आकर्षण ठरले आहे. आरोग्यासाठी फायदेशीर आणि चांगला दर मिळाल्यामुळे चियाची लागवड मोठ्या प्रमाणावर होत आहे. सध्या जिल्ह्यात 3 हजार 608 हेक्टर क्षेत्रावर चियाचे उत्पादन घेतले जात आहे.

जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. आणि जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरिफ  शाह यांच्या नेतृत्वाखाली चियाची लागवड प्रोत्साहनासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेअंतर्गत  शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.

 चियाच्या लागवडीसाठी योग्य जमीन आणि काळाची निवड. कमी पाण्यात चांगले उत्पादन घेण्यासाठी पद्धती.

सेंद्रिय पद्धतीने लागवड करण्याचे फायदे.

 

 तालुकानिहाय चियाची लागवड : मालेगाव 1 हजार 169 हेक्टर, रिसोड 972 हेक्टर, वाशिम 753 हेक्टर, मंगरूळपीर 598 हेक्टर, मानोरा 44 हेक्टर आणि कारंजा 72  हेक्टर करण्यात आली आहे.

 

मालेगाव तालुका चियाच्या लागवडीत अग्रेसर आहे.

आरोग्यासाठी चियाचे फायदे

चियाला  "सुपरफूड" म्हणून ओळखले जाते. याचे बियाणे पोषणतत्वांनी समृद्ध आहेत:  प्रथिने आणि तंतूमय पदार्थ शरीराला उर्जा आणि पचन सुधारते. ओमेगा- 3 फॅटी अॅसिड्स- हृदयविकार टाळण्यात मदत, साखर नियंत्रण- मधुमेह रुग्णांसाठी उपयुक्त. अँटीऑक्सिडंट्स-  त्वचेचा तजेला टिकवून ठेवते.

 

बाजारपेठ  आणि  दर : पुण्यातील एका नामांकित कंपनीने 14 हजार रुपये प्रति क्विंटल दराने सेंद्रिय पद्धतीने उत्पादित  चिया खरेदी करण्याचा करार केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या बाजारपेठेची हमी मिळाली आहे.

शेतकऱ्यांची प्रतिक्रिया : शेतकऱ्यांनी या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. संतोष पाटील (रिसोड) “चियाची लागवड करताना आम्हाला कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळाले.  बाजारपेठ उपलब्ध असल्याने आर्थिक अडचणी कमी झाल्या.”

 भविष्यातील उद्दिष्ट : वाशिम जिल्हा चिया उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनविणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवणे आणि सेंद्रिय शेतीला चालना देऊन पर्यावरणपूरक शेतीस प्रोत्साहन.

 निष्कर्ष : चियाच्या लागवडीमुळे वाशिम जिल्ह्यातील शेती क्षेत्राला नवा आयाम मिळाला आहे. जिल्हाधिकारी आणि कृषी विभागाच्या प्रयत्नांमुळे हे पीक शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा नवा स्रोत ठरले आहे. शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घेतला, तर जिल्ह्याचे आर्थिक चित्र सकारात्मकपणे बदलू शकते.

अधिक माहितीसाठी जिल्हा कृषि विभाग आणि कृषी विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

नुकतीच मी जिल्ह्यातील चिया पिकाची पाहणी केली.शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, पाऊस आणि पाण्याची कमतरता, तसेच वाढते कर्जबाजारीपण हे शेतकऱ्यांच्या नैराश्याचे मुख्य कारणे आहेत. स्थानिक प्रशासन ग्रामपंचायतस्तरावर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि कुटुंबातील सदस्यांच्या वैद्यकीय खर्चासाठी विविध सरकारी योजनांसह पोहोचत आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे आणि शेतकरी स्वावलंबी मिशन शेतकरी आणि विमा कंपन्यांमध्ये सुलभ संवाद साधत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही गंभीर बाब असून अशा मृत्यूंना आळा घालण्यासाठी उपाय शोधण्याचे मिशन करत आहे. 

                -ॲड. निलेश हेलोंडे,  
कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष

 

वाशिम जिल्ह्यात  चिया बीजांच्या उत्पादनाला जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रोत्साहन मिळत आहे. यंदा रब्बी हंगामात चिया बीजांची लागवड 1 हजार एकरांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे. विशेष म्हणजे, सेंद्रिय पद्धतीने उत्पादित चिया बीजांना पुण्यातील एका कंपनीमार्फत प्रति क्विंटल 14 हजार रुपये दराने खरेदी करण्याचा करार प्रशासनाच्या पुढाकाराने करण्यात आला आहे. 

जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी कृषी विभाग आणि आत्मा यंत्रणेला चिया बीजांच्या लागवडीसाठी नियोजनाबद्दल सातत्याने मार्गदर्शन केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन मिळत आहे, ज्यामुळे चिया बीजांची लागवड वाढविणे शक्य झाले आहे. 

या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना नवीन उत्पन्नाचे स्रोत मिळत आहेत, आणि सेंद्रिय पद्धतीने उत्पादित चिया बीजांना चांगला बाजारभाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होत आहे.
               -जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.

 संकलन:      
(यासेरोद्दीन काझी), .
जिल्हा माहिती अधिकारी, 
वाशिम
*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश