३६ वे रस्ता सुरक्षा अभियान वाशिम शहरात हेल्मेट रॅलीचे आयोजन उत्साहात

३६ वे रस्ता सुरक्षा अभियान

वाशिम शहरात हेल्मेट रॅलीचे आयोजन उत्साहात

वाशिम ,दि.६ जानेवारी (जिमाका) ३६ वे रस्ता सुरक्षा अभियान दि. १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशिम कार्यालयातर्फे साजरा करण्यात येत आहे. 
     या अभियानाअंतर्गत परिवहन विभागाकडून रस्ता सुरक्षा संदर्भात जनतेमध्ये जनजागृती व्हावी. याकरीता वेगवेगळे कार्यक्रम राबविले जात आहेत. मोटार सायकल वाहन चालकामध्ये हेल्मेट वापराबाबत जनजागृती व्हावी याकरीता दि. ३ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, महिला वर्ग, मोटार ड्रायव्हिंग स्कुल, पी.यु.सी. केंद्र, वाहन विक्रेते यांनी प्रत्यक्ष सहभाग घेवून शहारामध्ये मोटार सायकल रॅलीचे आयोजन केले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संग्रामकुमार जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक विनोद घनवट,पोलीस निरीक्षक शहर वाहतुक शाखा संतोष शेळके यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरूवात झाली. या रॅलीला पोलीस स्टेशन चौकातून आंबेडकर चौक, पाटणी चौक, अकोला नाका, जिल्हा सामान्य रुग्णालय येथून उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात रॅलीची सांगता करण्यात आली. रॅलीमध्ये शहर वाहतुक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक जाधव, मोटार वाहन निरीक्षक डी. पी. सुरडकर, एस. आर. पगार तसेच सहायक मोटार वाहन निरीक्षक एस. पी. सरागे, एस. बी. इंगळे, एम. आर. टवलारकर, जे. डी. काटे. आर. ए.विनकरे, एम. डी. मोरे, लाखन पठाण व कार्यालयीन सर्व कर्मचारी सहभागी होते.
   कार्यक्रम यशस्वीतेसाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी व
कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश