पत्रकारीतेमधील मुल्यांची जपणूक करीत समृद्ध पत्रकारीता करावी
- Get link
- X
- Other Apps
पत्रकारीतेमधील मुल्यांची जपणूक करीत समृद्ध पत्रकारीता करावी
• जिल्हा माहिती कार्यालयातील पत्रकार दिन कार्यक्रमातील सूर
• पत्रकार दिन उत्साहात साजरा
• दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
वाशिम, दि. ६ जानेवारी (जिमाका)- पत्रकारीतेमध्ये मूल्य जोपासले गेले पाहिजे. या मूल्यांच्या बळावरच समृद्ध पत्रकारीता करता येते. पत्रकार समाजाचा पाईक म्हणून कार्य करतो. समाजातील विविध समस्यांचा विषयनिहाय उलगडा करतो. पत्रकारांच्या लेखनीमधूनच अशा विविध सामाजिक समस्यांना वाचा फोडल्या जाते. या समस्यांकडे शासन, प्रशासनाचे लक्ष जावून तिथे शाश्वत विकास घडतो, असा सूर पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात निघाला.
कै. बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण नावाचे वृत्तपत्र ६ जानेवारी १८३२ रोजी काढले होते. त्यानिमित्त हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने आज दि.६ जानेवारी रोजी जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मराठी पत्रकारसंघाचे माजी राज्याध्यक्ष तथा जिल्हा पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष माधवराव अंभोरे, पत्रकार सर्वश्री अनिल कुमार वाल्ले, नंदकिशोर वैद्य, सुनील मिसर, शिकरचंद बागरेचा, सुनील गाडेकर, बबनराव खिल्लारे, रमेश उंडाळ, दत्ता महल्ले, अजय ढवळे, गणेश भालेराव, मंकेश माळी, अंतिम देशमुख, मनोज जयस्वाल, संदीप पिंपळकर, पप्पु घूगे, किरण पडघान, सुनिल बांगर, रवि राऊत,जिल्हा माहिती अधिकारी यासेऱोद्दीन फहद काझी यांच्यासह जिल्हा माहिती कार्यालयाचे राजू जाधव, हर्षराज हाडे व अमोल जाधव यांच्यासह आदीपत्रकार बांधवांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सर्वप्रथम बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अभिवादनानंतर पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment