मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने एम्पॉवरींग इनोव्हेशन, एलिव्हेटिंग महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी दीप प्रज्वलन केले. यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा व अन्य मान्यवर उपस्थित होते. सिडबी (SIDBI) स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाकडून स्टार्टअपसाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक प्रादेशिक विभागाला ३० कोटी रुपयांची तरतूद करणार आहे. काळाची गरज ओळखून स्टार्टअप धोरणाचा नवीन मसुदा तयार केला आहे. हे देशातील आधुनिक धोरण ठरणार असून राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करणार असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.नव उद्योजक आणि महिला उद्योजकांच्या नवकल्पना सक्षम करून महाराष्ट्राची उन्नती केली जाईल. देशात सुरुवातीला ४७१ स्टार्टअप होते, आज ती संख्या १ लाख ५७ हजार आहे. महाराष्ट्र केवळ भारताच्या #स्टार्टअप क्रांतीत सहभागी नाही तर त्याचे नेतृत्व करत आहे. राज्यात २६ हजार स्टार्टअप आहेत – मुख्यमंत्री#startupindia #Startup
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने एम्पॉवरींग इनोव्हेशन, एलिव्हेटिंग महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
यावेळी कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी दीप प्रज्वलन केले. यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा व अन्य मान्यवर उपस्थित होते. सिडबी (SIDBI) स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाकडून स्टार्टअपसाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक प्रादेशिक विभागाला ३० कोटी रुपयांची तरतूद करणार आहे. काळाची गरज ओळखून स्टार्टअप धोरणाचा नवीन मसुदा तयार केला आहे. हे देशातील आधुनिक धोरण ठरणार असून राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करणार असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
नव उद्योजक आणि महिला उद्योजकांच्या नवकल्पना सक्षम करून महाराष्ट्राची उन्नती केली जाईल. देशात सुरुवातीला ४७१ स्टार्टअप होते, आज ती संख्या १ लाख ५७ हजार आहे. महाराष्ट्र केवळ भारताच्या #स्टार्टअप क्रांतीत सहभागी नाही तर त्याचे नेतृत्व करत आहे. राज्यात २६ हजार स्टार्टअप आहेत – मुख्यमंत्री
#startupindia
#Startup
Comments
Post a Comment