पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर
पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर
वाशिम,दि.२४ जानेवारी (जिमाका) राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री. हसन मुश्रीफ दि.२५ जानेवारी रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. दि.२५ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता शासकीय विश्रामगृह वाशिम येथे आगमन व राखीव, दि.२६ जानेवारी रोजी सकाळी ९.१० वाजता शासकीय विश्रामगृह वाशिम येथून पोलिस कवायत मैदानाकडे प्रयाण, ९.१५ ते १०.३० भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा पोलिस कवायत मैदानावर ध्वजारोहण समारंभाला उपस्थिती, १०.३० वाजता वाशिम येथुन छत्रपती संभाजीनगर कडे प्रयाण करतील.
Comments
Post a Comment