बालविवाहमुक्त वाशिमचा संकल्प; शहरात जनजागृती रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद> पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते हिरवी झेंडी > बालविवाह पूर्णपणे थांबविण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे पालकमंत्री दत्तात्रय भरणे

बालविवाहमुक्त वाशिमचा संकल्प; शहरात जनजागृती रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते हिरवी झेंडी

बालविवाह पूर्णपणे थांबविण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे
  पालकमंत्री दत्तात्रय भरणे

वाशिम, (जिमाका) बालविवाह पूर्णपणे थांबविण्यासाठी सार्वत्रिक जनजागृती गरजेची असून, त्यासाठी समाजातील सर्व घटकांनी योगदान द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे केले.

 ‘बालविवाह, अल्पवयीन विवाह आणि सक्तीचे विवाह निर्मूलन आंतरराष्ट्रीय दिवसानिमित्त म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून महिला व बालविकास विभागाच्या वतीने आज वाशिम शहरात बालविवाहमुक्त जनजागृती रॅली काढण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी आमदार किरण सरनाईक, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे,तहसीलदार निलेश पळसकर , जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव विठ्ठल चौखंडे,जिल्हा क्रीडा अधिकारी, सचिन चव्हाण,जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, उत्तम शिंदे आदींची उपस्थिती होती.

बालविवाह ही सामाजिक समस्या असून, तिचे समूळ उच्चाटन करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याची गरज आहे. बालविवाहामुळे बालकांचे शिक्षण, आरोग्य आणि भविष्य धोक्यात येते. त्यामुळे बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती आणि सामाजिक सहभाग महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

रॅलीदरम्यान उपस्थितांना बालविवाहमुक्तीची शपथ देण्यात आली. या प्रभातफेरीमध्ये वाशिम शहरातील विविध शाळा, महाविद्यालये आणि शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थी व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांच्या सहभागातून बालविवाह निर्मूलनाचा संदेश शहरात पोहोचविण्यात आला.
00

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर