महात्मा जोतीराव फुले द्विजन्मशताब्दी वर्ष विशेष शिक्षणासोबत वैज्ञानिक दृष्टिकोनाचीही दिली शिकवण!
महात्मा जोतीराव फुले द्विजन्मशताब्दी वर्ष विशेष
शिक्षणासोबत वैज्ञानिक दृष्टिकोनाचीही दिली शिकवण!
महात्मा जोतीराव फुले यांनी समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा आणि कालबाह्य रूढींना विरोध करून विवेकवादी विचारांचा प्रसार केला. कोणतीही गोष्ट चिकित्सक बुद्धीने तपासून स्वीकारावी, सत्याचा शोध घ्यावा आणि विवेकाच्या आधारे जीवन जगावे, असा विचार त्यांनी समाजासमोर मांडला.
समाजाची प्रगती ही ज्ञान, तर्कशुद्ध विचार आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच साध्य होते, हा त्यांचा विचार आजही तितकाच महत्त्वाचा आहे.
विवेकवादी विचारांचा स्वीकार करूया, अंधश्रद्धामुक्त समाजनिर्मितीसाठी योगदान देऊया!
#महात्माफुले200 #महात्माज्योतीरावफुले #द्विजन्मशताब्दीवर्ष #महाज्योती #वैज्ञानिकदृष्टिकोन #अंधश्रद्धानिर्मूलन
Comments
Post a Comment