जनजातीय गौरव सेवा सप्ताहात सहभागी व्हा; आदिवासी संस्कृती, परंपरा आणि गौरवशाली इतिहासाचा सन्मान करूया ! 🌿


🌿 जनजातीय गौरव सेवा सप्ताहात सहभागी व्हा; आदिवासी संस्कृती, परंपरा आणि गौरवशाली इतिहासाचा सन्मान करूया! 🌿

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे नागरिकांना आवाहन

क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबर हा दिवस ‘जनजातीय गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त ११ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत जनजातीय गौरव सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, जल, जंगल आणि जमीन यांच्या संरक्षणासाठी संघर्ष करणारे भगवान बिरसा मुंडा यांचे जीवनकार्य देशाच्या इतिहासातील प्रेरणादायी पर्व आहे. त्यांचा संघर्ष, त्याग आणि स्वाभिमानाची शिकवण आजही समाजाला प्रेरणा देते.

या सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांचा गौरवशाली इतिहास, समृद्ध संस्कृती, परंपरा आणि सामाजिक योगदान जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासोबतच विविध शासकीय योजनांची माहिती पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनकल्याणकारी, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकानुसार, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला अंतर्गत अकोला, वाशिम आणि बुलढाणा या तीन जिल्ह्यांत हा सप्ताह आयोजित करण्यात येत आहे. १५ नोव्हेंबर रोजी शासकीय कार्यालयांमध्ये भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.

या सप्ताहातील विविध उपक्रमांमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आदिवासी समाजाच्या गौरवशाली परंपरेचा सन्मान करावा, असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.

🌱 आदिवासी अस्मितेचा सन्मान...
🌱 संस्कृतीचा गौरव...
🌱 विकासाच्या संकल्पनेला बळ...

जनजातीय गौरव दिनाच्या निमित्ताने भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांना आणि कार्याला विनम्र अभिवादन!

#जनजातीयगौरवसेवासप्ताह #जनजातीयगौरवदिन #भगवानबिरसामुंडा #आदिवासीविकास

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर