महात्मा जोतीराव फुले यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडताना शेतीच्या विकासासाठी दूरदृष्टीपूर्ण विचार मांडले.


🌾 दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी महात्मा फुले यांच्या शेतीविषयक विचारांची आजही प्रेरणा!

महात्मा जोतीराव फुले यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडताना शेतीच्या विकासासाठी दूरदृष्टीपूर्ण विचार मांडले. शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण, शेतीला आधुनिकतेची जोड, पाण्याचे नियोजन आणि शेतीपूरक व्यवसायांचा विकास यावर त्यांनी विशेष भर दिला.

आज बदलत्या हवामानामुळे आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतीसमोर विविध आव्हाने निर्माण झाली आहेत. अशा परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब जपणे, शेततळी व जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देणे, पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरवणे आणि उपलब्ध पाण्यानुसार पीक नियोजन करणे आवश्यक आहे.

शेती अधिक सक्षम आणि शाश्वत करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, पीक विविधीकरण आणि पूरक व्यवसायांची जोड देणेही महत्त्वाचे आहे.

महात्मा फुले यांच्या शेतकरी कल्याणाच्या विचारांतून प्रेरणा घेत जलसाक्षरता, जलसंवर्धन आणि शाश्वत शेतीसाठी समाजातील प्रत्येक घटकाने योगदान द्यावे.

पाणी जपूया, शेती समृद्ध करूया आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध होऊया!

#महात्माफुले200 #महात्माज्योतीरावफुले #द्विजन्मशताब्दी #जलसंवर्धन #शेतकरीकल्याण #शाश्वतशेती

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर