समान नागरी कायद्यावर २९ नोव्हेंबरला विभागीय जनसुनावणी
समान नागरी कायद्यावर २९ नोव्हेंबरला विभागीय जनसुनावणी
वाशिम, (जिमाका) समान नागरी कायद्याबाबत सामान्य नागरीक, विविध संस्था आणि हितसंबंधी गटांची मते, सूचना व हरकती जाणून घेण्यासाठी गठित समितीची विभागीय जनसुनावणी येत्या २९ नोव्हेंबर रोजी अमरावती येथे होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ही सुनावणी होणार असून अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांसाठी स्वतंत्र वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत.
अकोला जिल्ह्यासाठी सकाळी ११ ते १२, वाशिमसाठी *दुपारी १२.३० ते दीड,* बुलढाण्यासाठी अडीच ते साडेतीन, यवतमाळसाठी दुपारी चार ते पाच आणि अमरावती जिल्ह्यासाठी सायंकाळी साडेपाच ते साडेसहा अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक नागरीकांना नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे किंवा आपापल्या जिल्हाधिकारी कार्यालयात ठरलेल्या वेळेच्या एक तास आधी उपस्थित राहता येणार आहे. अमरावती येथे उपस्थित असलेल्या नागरीकांची सुनावणी समितीसमोर समक्ष होणार असून इतर जिल्ह्यांतील नागरीकांची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतली जाणार आहे.
प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसलेल्या नागरीकांना आपले मत ऑनलाईन पद्धतीनेही नोंदवता येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या https://ucc.maharashtra.gov.in/ या पोर्टलवर २७ मुद्द्यांवर माहिती देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरीकांनी या प्रक्रियेत सहभागी होऊन आपली मते नोंदवावीत, असे आवाहन विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment