Posts

वाशिमच्या महालक्ष्मी गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद-२०२६’; भूमी अभिलेख विभागाच्या डिजिटल सेवांची नागरिकांना माहिती💻 डिजिटल ७/१२, ई-हक्क आणि ई-मोजणी सेवांचा सुलभ लाभ घेण्याचे जिल्हा माहिती कार्यालयाचे आवाहन

Image
📢 वाशिमच्या महालक्ष्मी गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद-२०२६’; भूमी अभिलेख विभागाच्या डिजिटल सेवांची नागरिकांना माहिती 💻 डिजिटल ७/१२, ई-हक्क आणि ई-मोजणी सेवांचा सुलभ लाभ घेण्याचे जिल्हा माहिती कार्यालयाचे आवाहन 📍 वाशिम, दि. २२ सप्टेंबर (जिमाका) : गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला असून, या उत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ‘लोकसंवाद-२०२६’ हा विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत वाशिम येथील महालक्ष्मी गणेशोत्सव मंडळ येथे भूमी अभिलेख विभागाच्या विविध योजना व अत्याधुनिक डिजिटल सेवांची सविस्तर माहिती नागरिकांना देण्यात आली. वाशिम जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या सहकार्याने जिल्हा माहिती कार्यालय, वाशिमच्या वतीने विविध जनहितार्थ विषयांवर जनजागृती करण्यात येत आहे. २२ सप्टेंबर रोजी महालक्ष्मी गणेशोत्सव मंडळ येथे आयोजित कार्यक्रमात प्रवीण कुंजीर यांनी भूमी अभिलेख विभागामार्फत नागरिकांसाठी उपलब्ध अ...

नजीकच्या काळात विक्रमी पदभरती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा!

Image
नजीकच्या काळात विक्रमी पदभरती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा ! #भरती  #परीक्षा  #महाराष्ट्रशासन  #MahaDGIPR

🧹 ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमातून मानोरा पंचायत समिती परिसरात श्रमदान🌿 २ ऑक्टोबरच्या विशेष ग्रामसभेत जल समर्पण, योजना हस्तांतरण व स्वच्छता उपक्रमांचे नियोजन

Image
🧹 ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमातून मानोरा पंचायत समिती परिसरात श्रमदान 🌿 २ ऑक्टोबरच्या विशेष ग्रामसभेत जल समर्पण, योजना हस्तांतरण व स्वच्छता उपक्रमांचे नियोजन 📍 वाशिम (जिमाका) : ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत पंचायत समिती मानोरा येथे गटविकास अधिकारी राजपुरोहित यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा कक्षाचे मनुष्यबळ विकास सल्लागार शंकर आंबेकर तसेच ग्रापापू उपविभाग, मानोरा येथील अक्षय खंदारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. 🗓️ यावेळी १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत ग्रामस्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामस्तरावर स्वच्छता उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक नियोजन व जनसहभागाबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली. 💧 २ ऑक्टोबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करून जल समर्पण, योजना हस्तांतरण तसेच विविध स्वच्छता उपक्रमांचे नियोजन करण्याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामस्तरावर या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आवाहन करण्यात आले. 🤝 कार्यक्रमाच्या...

🌱 सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ 🌱🌳 सावळीच्या स्मशानभूमी परिसरात २०० वृक्षांची लागवड 🌳

Image
🌱 सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ 🌱 🌳 सावळीच्या स्मशानभूमी परिसरात २०० वृक्षांची लागवड 🌳 वाशिम : ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत सावळी येथे स्मशानभूमी परिसरात २०० वृक्षांची लागवड करण्यात आली. गटविकास अधिकारी ज्योती राजपुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. स्वच्छतेसोबतच पर्यावरण संवर्धनाला चालना देत स्मशानभूमी परिसरात हरित वातावरण निर्मितीसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. 🌿 २०० वृक्षांची लागवड… स्वच्छ परिसरासाठी पुढाकार… हरित भविष्यासाठी संकल्प! 🌿 #सेवासंकल्पअभियान #स्वच्छताहीसेवा #वृक्षलागवड #पर्यावरणसंवर्धन #सावळी #मानोरा #Washim

🎊 बाप्पाच्या मांडवात लोककल्याणकारी योजनांचा जागर! 🙏🌺 वाशिमच्या गणेशोत्सवात महिला-बालविकास योजनांचा ‘लोकसंवाद’

Image
🎊 बाप्पाच्या मांडवात लोककल्याणकारी योजनांचा जागर! 🙏 🌺 वाशिमच्या गणेशोत्सवात महिला-बालविकास योजनांचा ‘लोकसंवाद’ 📍 वाशिम, दि. २१ सप्टेंबर (जिमाका) : गणेशोत्सवाच्या उत्सवी वातावरणात शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. 📅 आज दि. (२१) सप्टेंबर रोजी वाशिम येथील बालू चौक स्थित ‘सरकार गणेशोत्सव मंडळा’च्या प्रांगणात महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांचा जागर करण्यात आला. 👩‍👧‍👦 प्रसंगी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी भगवान ढोले यांनी महिला आणि बालकांच्या सक्षमीकरण व संरक्षणासाठी राबवल्या जाणाऱ्या— 🔹 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 🔹 प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 🔹 मिशन वात्सल्य व बाल संगोपन योजना 🔹 सखी वन स्टॉप सेंटर व मिशन शक्ती 🔹 बेटी बचाओ, बेटी पढाओ व पोषण अभियान या प्रमुख योजनांबाबत सविस्तर माहिती दिली. 📑 या योजनांचा मुख्य उद्देश, पात्र लाभार्थी आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, याबाबत उपस्थितांच्या शंकांचे निरसनही करण्यात आले. 🌸 सरकार गणेशोत्सव मंडळ परिसरात प...