जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी घेतला कृषी विभागाचा आढावा नैसर्गिक शेती, खत उपलब्धता, महाविस्तार अॅपवर भर


जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी घेतला कृषी विभागाचा आढावा 

नैसर्गिक शेती, खत उपलब्धता, महाविस्तार अॅपवर भर

वाशिम ,दि.१६ सप्टेंबर (जिमाका) जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज जिल्ह्यातील कृषी विभाग व आत्मा अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना, कृषी उपक्रम व कार्यक्रमांचा सविस्तर आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात आयोजित आढावा बैठकीत बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी रासायनिक खतांची उपलब्धता जिल्ह्याच्या संकेतस्थळावर नियमितपणे प्रसिद्ध करणे, बायो फर्टिलायझरच्या वापराबाबत व्यापक जनजागृती करणे,
महाविस्तार अॅपचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे, कृषी समृद्धी योजनेतील निधी स्थानिक गरजांनुसार खर्च करणे,शेतीशाळांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणे, याशिवाय चिया पिक, गहू, हरभरा आणि चिया लागवडीचा खर्च, आत्मा अंतर्गत घेण्यात येणाऱ्या कार्यशाळा, प्रात्यक्षिके, शेतकरी शेतीशाळा, खरेदीदार-विक्रेता संमेलन, तांत्रिक मार्गदर्शन, कृषी विस्तार व बाजारपेठेची माहिती या विषयांवरही विशेष भर दिला.
तसेच डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन, राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन २०२५-२६, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत केंद्र शासनाचे मंजूर आवंटन व जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ यावर सविस्तर विचारविनिमय झाला.

बैठकीत आंतरराज्य, राज्यांतर्गत व जिल्हा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण, पीक प्रात्यक्षिके, अभ्यास दौरे, शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद व क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रम आयोजित करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले.

याशिवाय वाशिम शेती शिल्प कृषी विपणन कक्ष, वत्सगुल्म भूजल पुनर्भरण स्पर्धा, जलतारा उपक्रम, वत्सगुल्म स्मार्ट पेरणी स्पर्धा यांचा आढावा घेऊन अधिकारी वर्गास आवश्यक दिशा-निर्देश दिले. यासह
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री फसल विमा योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम, डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (POCRA), मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा योजना, बैठकीस प्रकल्प संचालक आत्मा अनिसा महाबळे, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके, कृषी विकास अधिकारी अभिजित देवगीरकर, सर्व तालुका कृषी अधिकारी आदी उपस्थित होते. माहितीचे सादरीकरण अनिसा महाबळे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यान्वित