ग्रामस्थांच्या अडीअडचणी सोडविण्यास प्रशासन कटिबद्ध जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर रामगाव येथे आदीसेतू शिबिर उत्साहात संपन्न
ग्रामस्थांच्या अडीअडचणी सोडविण्यास प्रशासन कटिबद्ध
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
रामगाव येथे आदीसेतू शिबिर उत्साहात संपन्न
वाशिम, (जिमाका) छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत १७ सप्टेंबर ते २ आक्टोबर २०२५ या कालावधीत सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे.
या अभियानाच्या दुस-या टप्यात रामगाव या १०० टक्के आदीवासी बहुल गावामध्ये आज २३ सप्टेंबर रोजी आदीसेतु हा कार्यक्रम जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आला होता.यावेळी जिल्हाधिकारी श्री.कुंभेजकर बोलत होते.
मंगरुळपीर तालुक्यातील आदीवासी लोकसंख्या असलेल्या पाच गावांची निवड करण्यात येवुन विविध अधिका-यांमार्फत गावभेटी आयोजीत करण्यात आल्यात. त्यामध्ये आदीवासी बहुल जनुना खुर्द या गावात अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील यांनी भेट देवुन ग्रामस्थांची अडीअडचणी व गावातील मुलभुत सुविधा याबाबतच्या अडचणी जाणुन घेतल्या. मौजे मोतसावंगा येथे उपजिल्हाधिकारी महसुल विरेंद्र जाधव यांनी भेट व पाहणी करुन अडीअडचणी जाणुन घेतल्या .मौजे एकांबा येथे तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांनी भेट देवुन अडीअडचणी जाणुन घेतल्या. तर अजगाव येथे तहसिलदार रविंद्र राठोड यांनी भेट देवुन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.
मौजे रामगाव या ठिकाणी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी भेट देवुन अडचणी जाणुन घेतल्यात. यावेळी आदीवासी परंपरेने त्यांचे स्वागत गावक-यांनी मोठया उत्स्पुर्तपणे स्वागत केले व गावफेरी करण्यात आली. जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी व ग्रामपंचायत या ठिकाणी भेटी देवुन तेथील अडचणी जाणुन घेतल्या मौजे रामगाव याठिकाणी धरती आबा योजना अंतर्गत महीला व बालविकास विभाग यांचेकडून कार्यक्रम राबविण्यात आला.
या आदीसेतु शिबीरामध्ये महसुल विभागामार्फत दिले जाणारे मतदान ओळखपत्र, कोतवालबुक नक्कल, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, जिवंत सातबारा अंतर्गत वारस फेरफार, संजय गांधी लाभ मंजर योजना इत्यादी प्रकारचे ,९२ दाखले वाटप करण्यात आले आहे. ग्रामपंचायती मार्फत जन्म मृत्यु, विवाह नोंदणी, आठ-अ व अतिक्रमण नियमानुकुल पटटे वाटप-१, असे २० दाखले वाटप करण्यात आलेले आहे. आधारकार्ड दुरुस्ती व नविन आधार कार्ड काढणे असे-२९, कृषी विभाग लाभ बाबचे पत्र-१, भुमी अभिलेख सनद-३ आयुष्यमान कार्ड-५१ वाटप करण्यात आले. तर १२६ नागरीकांची आरोग्य तपासणी सदर शिबीरामध्ये करण्यात आली.
गावामध्ये सन १९७१ पासुन प्रथमच जिल्हाधिकारी महोदय आल्याने रामगाव, मोतसावंगा गावातील नागरीकांनी उत्स्पुर्तपणे सहभाग नोंदविला. यावेळी प्रास्तावीक तहसिलदार रविंद्र राठोड यांनी केले. महसुल विभागातील विविध सेवा बाबत माहिती मा.उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी दिली. आदीवासी विभागाच्या सेवांची माहिती प्रकल्प संचालक यांनी दिली. कृषी व ग्राम विकास या विभागामार्फत दिल्या जाणा-या सेवाची माहिती तालुका कृषी अधिकारी व गट विकास अधिकारी पंचायत समिती यांनी दिली. तालुका आरोग्य अधिकारी यांनी आरोग्य विषयक सेवांबाबत माहिती दिली.
कार्यक्रमात बोलतांना अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील यांनी कार्यक्रमाचा हेतु उपास्थितांसमोर मांडला. अध्यक्षस्थानावरुन बोलतांना मा.जिल्हाधिकारी यांनी सदर कार्यक्रमाबाबत व विविध समस्यांबाबत मुददेनिहाय ग्रामस्थांसोबत चर्चा केली व जनतेनी मांडलेल्या मुदयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास मोठया संखेने मोतसावंगा व रामगाव येथील गावकरी तसेच सरपंच ग्राम पंचायत सदस्य व सर्व ग्रामस्तरीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. ग्राम महसुल अधिकारी विलास लोंढे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.
Comments
Post a Comment