उद्योग सुलभतेवर भर द्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर जिल्हा उद्योग मित्र व जिल्हास्तरीय निर्यात प्रचालन समितीची बैठक संपन्न

उद्योग सुलभतेवर भर द्यावा 
     जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

जिल्हा उद्योग मित्र व जिल्हास्तरीय निर्यात प्रचालन समितीची बैठक संपन्न

वाशिम, (जिमाका)  जिल्हा उद्योग मित्र व जिल्हास्तरीय निर्यात प्रचालन समितीची बैठक औद्योगिक विकासासंबंधी विविध विषयांवर सविस्तर चर्चा होऊन मैत्री २.० पोर्टलवरील प्रलंबित अर्जांचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला.
      जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उद्योग मित्र  तसेच जिल्हा निर्यात प्रचालन समितीची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी बैठकीस विविध औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी यांच्यासह परिविक्षाधीन अधिकारी आकाश वर्मा, अतिरिक्त जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, पूनम घुले, सहाय्यक संचालक, नगररचना कार्यालय,ललित राठोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, आरिफ शहा, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, अकोला – राजराम गुठळे, डी.डी.एम., नाबार्ड शंकर कोकडवार, डी.एस.यू.,  एम. अमीन, सहाय्यक अभियंता, वाशिम पूर्व – जी.आर. साबाळे, उपकार्यकारी अभियंता,  हेमंतकुमार गाडबैल, पी.के. दहापुते, अध्यक्ष, एमआडीसी असोसिएशन, आनंद एम. राऊत, उपाध्यक्ष, एमआडीसी असोसिएशन, एस. व्ही. घोटे, गीताजंली एन्टरप्रायजेस, एमआयडीसी,  प्रशांत भालेराव, मे. बाहेती फुड प्रोसेसर, प्रविण बाहेती, पतंजली फ्रुट्स लिमिटेड, रवींद्र येवतकर (प्रतिनिधी) आदी उपस्थित होते.
      या बैठकीत मैत्री २.० पोर्टलवरील प्रलंबित अर्जांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक पूनम घुले यांनी मैत्री २.० संदर्भात सविस्तर सादरीकरण केले.
      बैठकीदरम्यान माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी विशेषतः एमआयडीसी क्षेत्रातील औद्योगिक युनिटसमोर निर्माण होणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला व संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
     जिल्ह्यातील निर्यातवृद्धीबाबतही चर्चासत्र घेण्यात आले. मैत्री पोर्टलवरून प्राप्त अर्ज वेळेत निकाली काढावेत. तसेच डॅशबोर्डवर काही सुधारणा कराव्यात अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. विविध विभागांकडे प्रलंबित असलेल्या औद्योगिक युनिटसाठीच्या एनओसी अर्जांबाबत नियमित आढावा घेण्याचे आश्वासन देत जिल्हाधिकाऱ्यांनी औद्योगिक संघटनांना आवश्यक सहकार्य केले जाईल असे सांगितले.
     जिल्ह्यात उद्योगांना सुलभ वातावरण निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे.  जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी उद्योजकांच्या अडीअडचणी ऐकून घेतल्या आणि उद्योग व व्यवसाय वृद्धीसाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले.

जिल्ह्याचा निर्यातीत वाटा वाढविण्यासाठी आवश्यक निर्देश दिले गेले. तसेच, वाशिम जिल्ह्यात मंजूर झालेल्या लॉजिस्टिक पार्क च्या कामांना गतिशीलता आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांना आवश्यक सूचनाही दिल्या.

Comments

Popular posts from this blog

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यान्वित

विद्युत सुरक्षा सप्ताहाचा समारोप