जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आधार किटचे वितरण
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आधार किटचे वितरण
वाशिम, दि.२९ सप्टेंबर (जिमाका) जिल्ह्यातील नागरिकांसाठी आधार नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्याहस्ते आज मालेगाव तालुक्यातील इ सेवा केंद्र चालकांना आधार किटचे वितरण करण्यात आले.
या किटमधे लॅपटॉप ,स्क्रीन मॉनिटर / डिस्प्ले,प्रिंटर ,फिंगरप्रिंट स्कॅनर , आयरिस स्कॅनर ,वेब कॅमेरा ,सिंगल आयरिस स्कॅनर, सिंगल बायोमेट्रिक यंत्र , बॅनर ,नेटवर्क हब,बल्ब समावेश आहे.
यावेळी नागरिकांना आधार सेवा सोयीस्कर करण्यासाठी आवश्यक माहिती आणि मार्गदर्शन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी केले.आणि नोंदणी प्रक्रियेतील पारदर्शकतेवर भर दिला. नियमानुसार काम करावे कुठेही अनुचित प्रकार घडू नये, कुठेही तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी असे सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना आधार किटचा वापर करून नागरिकांनी सुविधा घेण्याचे आवाहन केले.
वितरणावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, जिल्हा प्रकल्प प्रमुख सौरभ जैन उपस्थित होते.
Comments
Post a Comment