पोहरादेवी व उमरी येथील विकासकामांची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी*तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा घेतला आढावा**मानोरा तहसील कार्यालयालाही भेट*




पोहरादेवी व उमरी येथील विकासकामांची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

*तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा घेतला आढावा*

*मानोरा तहसील कार्यालयालाही भेट*

वाशिम, दि. ९ सप्टेंबर (जिमाका) बंजारा समाजाची ‘काशी’ म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध पोहरादेवी तसेच उमरी येथील विकासकामांची पाहणी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज (दि.९ सप्टेंबर) केली. यावेळी त्यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा आढावा घेऊन पर्यटनदृष्ट्या आकर्षक व नागरिकांसाठी सुविधायुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या कामांना गती देण्याच्या सूचना दिल्या.

या पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी तसेच बांधकामाधिन असलेले पर्यटक निवास,संत सेवालाल महाराज मंदिर, रामराव बापू समाधी स्थळ,उमरी येथील जेतालाल महाराज मंदिर परिसर आणि भाविकांसाठी उभारण्यात येत असलेले यात्रीशेड व बणजारा विरासत संग्रहालय, आदी स्थळांना भेट दिली. विकासकामांतर्गत सुरू असलेल्या बांधकामांची प्रगती तपासून संबंधित यंत्रणेला गतीमान करण्याचे निर्देश दिले.


यावेळी उपविभागीय अधिकारी कारंजा कैलास देवरे, मानोरा तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंगडे, कार्यकारी अभियंता (विद्युत) श्रीमती वाकोडे, गटविकास अधिकारी प्रफुल्ल भोरखडे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व कंत्राटदार उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर म्हणाले, संत सेवालाल महाराज तीर्थक्षेत्र विकास योजना तसेच उमरी व पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील प्रस्तावित कामे मार्गी लावावीत. निधीअभावी प्रलंबित असलेल्या कामांबाबत विभाग व कंत्राटदारांनी परस्पर समन्वय ठेवून गती द्यावी.

विशेषतः पोहरादेवीच्या बाबतीत शासनाने मान्य केलेल्या विकास आराखड्याला प्रत्यक्षात आणण्यासाठी व मूर्त स्वरूप देण्यासाठी जिल्हा प्रशासनाची विशेष भूमिका आहे. आराखड्याअंतर्गत बणजारा विरासत,मंदिर परिसर, रस्ते, वाहतूक नियोजन, पायाभूत सुविधा, महिला सुविधा, शौचालये, पर्यटक निवास यासाठी शासन आणि प्रशासनाचा योग्य समन्वय ठेवावा. असे ते म्हणाले. यांसारख्या कामांसाठी शासन व प्रशासनाने घनिष्ठ समन्वय ठेवणे आवश्यक आहे. कार्यकारी अभियंता शुभम जोशी यांनी प्रगतीपथावरील कामांची माहिती दिली.

या दौऱ्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मानोरा तहसील कार्यालयालाही भेट देऊन विविध विभागांच्या कामकाजाची पाहणी केली व आवश्यक त्या सूचना तहसीलदार डॉ. येवलीकर यांना दिल्या.



Comments

Popular posts from this blog

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यान्वित