मरणोत्तर अवयवदानासाठी पुढाकार घ्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.



मरणोत्तर अवयवदानासाठी पुढाकार घ्या  जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. 

वाशिम,दि.५ ऑगस्ट(जिमाका)
मृत्यूनंतरही जीवदान देता येते, जीवन जगता जगवता येते" या संकल्पनेला बळ देत जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. यांनी  जिल्ह्यातील नागरिकांना मरणोत्तर अवयवदानासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार १ ते ८ ऑगस्ट २०२५ दरम्यान अवयवदान सप्ताह साजरा केला जात असून, याअंतर्गत विविध जनजागृती उपक्रम राबविले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभाग, उपजिल्हा रुग्णालये, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत जनजागृती केली जात आहे.

जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, आपण मृत्यूनंतर उपयोगी न पडणारे अवयव दान करून अनेक जिवांना जीवनदान देऊ शकतो. डोळे, हृदय, मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुसे, त्वचा इत्यादी अवयव मरणोत्तर दान करता येतात. हे दान मानवतेची खरी सेवा आहे."

नोंदणीसाठी राष्ट्रीय अवयव व ऊती स्थानांतरण संस्थेद्वारे अधिकृत वेबसाईटवर सुविधा उपलब्ध असून, इच्छुक व्यक्तींनी खालील लिंकवर क्लिक करून आपली नोंदणी करावी:

🔗 https://notto.abdm.gov.in/register

"अवयवदान हे काळानुसार बदलणाऱ्या समाजाची गरज आहे. चला, आपण सर्व मिळून 'अंगदान – जीवनदान' या चळवळीत सहभागी होऊया" असेही जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी आवर्जून सांगितले.

Comments

Popular posts from this blog

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यान्वित