‘हर घर तिरंगा’ अभियान प्रभावीपणे राबवावे जिल्हा प्रशासनाने आवाहन
‘हर घर तिरंगा’ अभियान प्रभावीपणे राबवावे
जिल्हा प्रशासनाने आवाहन
वाशिम दि. १४ ऑगस्ट (जिमाका) देशभरात देशभक्तीचे वातावरण निर्माण व्हावे, राज्यस्तरापासून गावपातळीपर्यंत तिरंगामय वातावरण व्हावे, या उद्देशाने १५ ऑगस्टपर्यंत राज्यात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान अधिक उत्साहपूर्ण वातावरणात प्रभावीपणे राबविण्यात यावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे ‘हर घर तिरंगा’ अभियान राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये राबविला जाणार आहे. राज्यात मागील तीन वर्षापासून ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. यावर्षीचे अभियान तीन टप्प्यात राबविण्यात येत आहे. पहिला टप्पा २ ते ८ ऑगस्ट २०२५, दुसरा टप्पा ९ ते १२ ऑगस्ट २०२५ या कालावधीत राबविला गेला. तर तिसरा टप्पा १३ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत राबविण्यात येत आहे.
‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून तिरंगामय वातावरण निर्मिती व्हावे, यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी दृश्य माध्यमांचा वापर करण्यात यावा. आपल्या भारतीय राष्ट्रध्वजाची माहिती सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वयंसेवकांना शाळेच्या भिंतीवर तिरंगाचे चित्र काढणे, तिरंगाविषयक बाबींचे प्रदर्शन भरवणे, रांगोळी स्पर्धा आयोजित करणे, सहभागी होण्यासाठी जनतेला आवाहन करणे, तिरंगा तयार करण्याची स्पर्धा आयोजित करणे असे विविध स्पर्धात्मक उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्व शाळा तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्याकडून स्वत:चे घर, आजुबाजूचा परिसर, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविणे, तिरंगाची रोषणाई आणि लाईटिंग करणे, प्रभातफेरीचे आयोजन करणे असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.
तिसरा टप्प्या १३ ऑगस्टपासून सुरू होत असून यात प्रत्येक घर, कार्यालय, वाहने यावर तिरंगा ध्वज फडकविण्यात येणार आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढावा यासाठी ध्वजारोहणाच्या सेल्फी काढून केंद्र शासनाच्या www.harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करण्याबाबत आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
0000
Comments
Post a Comment