कारंजा येथील रोजगार मेळाव्यात २४८ उमेदवारांची निवड
वाशिम , दि . ०१ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व कारंजा येथील एस. एस. एस. के. आर. इन्नाणी महाविद्यालय, विद्याभारती एच. एस. सी. व्होकेशनल कोर्स यांच्या संयुक्त विद्यमाने कारंजा येथे आयोजित रोजगार मेळाव्यात २४८ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. याप्रसंगी सर्वप्रथम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक अ. सं. ठाकरे यांनी प्रास्ताविक केले. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या संधीचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी लाभ घेण्याची गरज आहे. स्थानिक ठिकाणीच रोजगार मिळण्याची अपेक्षा न ठेवता अनुभवातून कौशल्य विकसित करण्यास युवकांनी प्राधान्य द्यावे, असे श्री. ठाकरे यावेळी म्हणाले. विद्याभारती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. राजपूत म्हणाले, बेरोजगारांची संख्या वाढत आहे. रोजगार मिळविण्यासाठी युवकांनी प्रामाणिक प्रयत्न केल्यास त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. विविध क्षेत्रात प्रचंड मेहनतीच्या जोरावर आपण यशस्वी होऊ शकतो. त्या...