Posts

🌾 मालेगाव तालुक्यातील शिवारात जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्याकडून पिकांच्या नुकसानीची पाहणी📌 नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

Image
🌾 मालेगाव तालुक्यातील शिवारात जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्याकडून पिकांच्या नुकसानीची पाहणी 📌 नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना वाशिम, दि. १४ सप्टेंबर (जिमाका) : जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी १३ सप्टेंबर रोजी मालेगाव व मौजे नांगरतास येथील शेतशिवारात सोयाबीन व कापूस पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून पिकांची सद्यस्थिती तसेच झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली. 🌧️ पावसामुळे पिकांवर झालेला परिणाम, नुकसानीचे स्वरूप आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी याबाबत जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी शेतकऱ्यांकडून माहिती घेतली. पिकांच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या. 👥 यावेळी तहसीलदार दीपक पुंडे, तालुका कृषी अधिकारी कैलास देवकर यांच्यासह मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. #वाशिम #मालेगाव #पिकनुकसान #सोयाबीन #कापूस #शेतकरी #जि...

⚖️ राष्ट्रीय लोक अदालतीत ५९४ प्रकरणे निकाली💰 १९ कोटी ७० लाखांहून अधिक रकमेची तडजोड

Image
⚖️ राष्ट्रीय लोक अदालतीत ५९४ प्रकरणे निकाली 💰 १९ कोटी ७० लाखांहून अधिक रकमेची तडजोड वाशिम, दि. १३ सप्टेंबर (जिमाका) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार १२ सप्टेंबर रोजी वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुका तसेच जिल्हा न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या लोक अदालतीत एकाच दिवसात ५९४ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून एकूण १९ कोटी ७० लाख ५० हजार ७११ रुपयांच्या रकमेची तडजोड झाली आहे. सदर लोक अदालतीचे उद्घाटन उपस्थित पक्षकारांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती तथा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती एन. एस. देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. लोक अदालतीदरम्यान मोटार अपघात दावा प्रकरण क्र. ४०/२०२२ हा तडजोडीने निकाली काढून न्यायमूर्तींच्या हस्ते संबंधित पक्षकारास ९५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. तसेच उच्च न्यायालयाने विहित मुदतीत निकाली काढण्याचे आदेश दिलेले दोन दिवाणी दावे तडजोडीने पूर्ण झाल्याने, त्या दाव्य...

#वाशिम अमरावती : जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापित विशेष कक्षात निवासी उपजिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी (महसूल) यांच्याकडे प्रत्यक्ष निवेदन सादर करता येणार आहे.

Image
#वाशिम अमरावती : जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापित विशेष कक्षात निवासी उपजिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी (महसूल) यांच्याकडे प्रत्यक्ष निवेदन सादर करता येणार आहे. #भरती  #परीक्षा  #महाराष्ट्रशासन

वाशिम जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीची तात्काळ पाहणी करावीपालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे प्रशासनाला तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश

Image
वाशिम जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीची तात्काळ पाहणी करावी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे प्रशासनाला तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश वाशिम : पावसातील खंड आणि कमी पावसामुळे वाशिम जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिके, पाणी व चारा उपलब्धतेची पाहणी करून तातडीने वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे. यामध्ये पिकांची सद्यस्थिती, पेरणीची वेळ, शेवटचा झालेला पाऊस, पावसातील खंड, जमिनीतील ओलावा तसेच पिकांना उपलब्ध असलेले पाणी याची माहिती घेण्यात येईल. यासोबतच गावांमधील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि जनावरांसाठी चारा व पाण्याची स्थिती याचाही आढावा घेण्यात येणार आहे. पाहणीदरम्यान शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी व परिस्थितीची माहिती ...

भरती परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी अमरावती विभागातून सूचना व अभिप्राय पाठविण्याबाबत आवाहन*

Image
*भरती परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी अमरावती विभागातून सूचना व अभिप्राय पाठविण्याबाबत आवाहन* विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका चालक, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी सक्रिय सहभागी व्हावे. अमरावती, दि. 13 : शासनाने राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी तसेच परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. या समितीच्या कार्यकक्षेनुसार राज्यातील प्रत्येक महसुली विभागातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, तज्ज्ञ व इतर संबंधित हितधारकांशी चर्चा करून भरती परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा करण्यासाठी सूचना, शिफारशी, हरकती व अभिप्राय प्राप्त करून घेतले जाणार आहेत. त्यानूसार अमरावती विभागातील संबंधित हितधारकांशी चर्चा करण्यासाठी उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष व सदस्य गुरुवार, दि. 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 5.30 दरम्या...