श्री गुरू तेग बहादूर यांचे ३५० वे शहिदी समागम वर्षकारंजा शहरात उत्साहपूर्ण वातावरणात मोटरसायकल रॅली
श्री गुरू तेग बहादूर यांचे ३५० वे शहिदी समागम वर्ष
कारंजा शहरात उत्साहपूर्ण वातावरणात मोटरसायकल रॅली
युवकांचा उत्स्फूर्त सहभाग
वाशिम, (जिमाका) गौरवशाली इतिहास सादर करणारा चित्ररथ, बाईकवर उत्साहाने सहभागी तरूण, महिलाभगिनी, आबालवृद्ध, ज्येष्ठ नागरिक तसेच आसमंत दुमदुमून टाकणारा संत, महापुरूष, शूरवीर, हुतात्मे यांचा जयघोष अशा उत्साहपूर्ण वातावरणात 'हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर' यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त कारंजा शहरात भव्य रॅली ३ डिसेंबर रोजी काढण्यात आली.
श्री गुरू तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त दि. ७ डिसेंबर रोजी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम होणार असून, जिल्ह्यातील शेकडो भाविक नागपूरला जाणार आहेत. त्यानिमित्त कारंजा शहरात शिवाजी नगर येथून भव्य शुभारंभ करण्यात आला. तर जयस्तंभ चौक-सिंधी कॉलनी व गुरुद्वारा येथे समारोह करण्यात आला. अनेक मान्यवर रॅलीत सहभागी होते. शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, वाल्मीकि, मोहयाल, सिंधी आदी समाजबांधवांसह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते.
शहरात ठिकठिकाणी रॅलीचे स्वागत करण्यात आले. चित्ररथाद्वारे गौरवशाली इतिहास प्रदर्शित करण्यात आला.
यावेळी विलास राठोड राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय बंजारा परिषद,रामेश्वर पवार
हिंद दी चादर वाशिम जिल्हा समन्वयक, गंगाधर कांबळे धर्म जागरण जिल्हा समन्वयक व विविध समाजबांधव उपस्थित होते.
दि ७ डिसेंबर रोजी नागपूर होत असलेल्या ऐतिहासिक कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहण्याकरिता सर्व समाजांना आवाहन यावेळी करण्यात आले.
०००
Comments
Post a Comment