हिंद दी चादर" श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी शताब्दी समागम समारंभाच्या प्रचारार्थ डिजिटल चित्ररथ वाशिम जिल्ह्यात दाखल



"हिंद दी चादर" श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी शताब्दी समागम समारंभाच्या प्रचारार्थ डिजिटल चित्ररथ वाशिम जिल्ह्यात दाखल 

वाशिम, (जिमाका) हिंदू धर्म आणि मानवतेचे रक्षण करणारे, हिंद दी चादर म्हणून विश्वात ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी शताब्दी समारंभानिमित्त गुरुसाहेबांचा  इतिहास आणि कार्यक्रम जाहीर करण्यासाठी प्रचारार्थ निघालेला डिजिटल चित्ररथ आज वाशिम जिल्ह्यात उत्साहपूर्ण स्वागतासह दाखल झाला. 

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून डिजिटल चित्ररथ प्रचारार्थ रवाना करण्यात आला.यावेळी अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय ससाणे, उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव, जिल्हा माहिती अधिकारी श्वेता पोटुडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

शिख धर्माच्या तेजस्वी परंपरेचे दर्शन घडवणाऱ्या या आकर्षक चित्ररथाचे गुरुद्वारा समिती, सामाजिक-धार्मिक संस्था, विविध समुदाय आणि नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी उपस्थितांनी गुरु साहिबांविषयी कृतज्ञता आणि श्रद्धा व्यक्त केली.

यावेळी गुरू तेग बहादुर साहिब जी यांनी समाजातील दुर्बल, पीडित, शोषितांना दिलेला न्याय व मानवी हक्कांचा संदेश आजही प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील यांनी केले. 

चित्ररथात गुरू साहिबांच्या जीवनकार्याचे विविध प्रसंग, शिख परंपरेचा गौरवशाली इतिहास, आणि शहादतीचा संदेश कलात्मक सादरीकरणातून प्रदर्शित करण्यात येणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले.कार्यक्रमानिमित्त समाजात बंधुता, शांतता आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यात येणार आहे.

चित्ररथ पुढील काही दिवस जिल्ह्यातील विविध शहरांत फिरणार असून याव्दारे शबद-कीर्तन, गुरू का लंगर आणि प्रेरणादायी व्याख्यान दाखविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. 

यावेळी रामेश्वर पवार,गंगाधर कांबळे,अश्वत्थामा चव्हाण,अशोक चौरे,परमितसिंह सेठी,जस्पालसिंह सचदेवा,
अन्वितसिंह सेठी आदींची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर