श्री गुरू तेग बहादूर यांचे ३५० वे शहिदी समागम वर्ष जिल्ह्यात ठिकठिकाणी कार्यक्रमचित्ररथातून श्री गुरु तेग बहादुर साहिबजींच्या जीवनकार्यावर प्रकाश



श्री गुरू तेग बहादूर यांचे ३५० वे शहिदी समागम वर्ष

जिल्ह्यात ठिकठिकाणी कार्यक्रम

चित्ररथातून श्री गुरु तेग बहादुर साहिबजींच्या जीवनकार्यावर प्रकाश

वाशिम, (जिमाका) हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी शताब्दी समागम वर्षानिमित्त नागपूर येथे भव्य कार्यक्रम होणार असून, वाशिम जिल्ह्यातून शेकडो भाविक जाणार आहेत.

 त्यानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम घेण्यात येत असून, चित्ररथाद्वारे विविध ठिकाणांना भेट देऊन साहिबजींच्या जीवनकार्याची माहिती देण्यात येत आहे.
 

जिल्ह्यातील सिख, सिकलीगर, बंजारा, लबाना, मोहयाल व सिंधी समाजबांधवांची अधिक लोकसंख्या असलेल्या भागासह संपुर्ण जिल्ह्यात हा चित्ररथ फिरत असून साहिबजींच्या जीवनकार्यावर प्रकार टाकणारी चित्रफित रथाद्वारे ठिकठिकाणी दाखविण्यात येत आहे. 

दि.७ डिसेंबर रोजी नागपूर येथे शहिदी शताब्दी समागमानिमित्त आयोजित कार्यक्रमाची जनजागृती देखील रथाच्या माध्यमातून केली जात आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी चित्ररथांद्वारे कार्यक्रमाची माहिती पोहोचविण्यात येत आहे. 
 ०००

Comments

Popular posts from this blog

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यान्वित