कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये जीवनावश्यक शेतमालाची खरेदी-विक्री सुरु करण्याचे आदेश
· ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना वाशिम , दि. ३० : ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्या ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र या आदेशात बदल करून कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी गर्दी कमी करणे, आवश्यक खबरदारी घेण्याच्या अटींवर जिल्ह्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समितींमध्ये जीवनावश्यक शेतमालाच्या खरेदी-विक्री व्यवहार सुरु ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत. कोरोना संदर्भात जनजागृती होण्यासाठी बाजार समिती कार्यक्षेत्रातील बाजार व उपबाजार क्षेत्रातील परिसरात लोकांना कोरोना विषाणूपासून काळजी घेण्याबाबत फलक लावून अथवा उद्घोषणाद्वारे आवाहन करावे व आवश्यक माहिती द्यावी. बाजार समितीमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना कोरोना विषयक जनजागृती करणाऱ्या माहितीपत्रकांचे वाटप करावे. बाजार आवारात सार्वजनिक स्वच्छता ठेवण्याकडे संपूर्णपणे लक्ष देण्यात यावे. बाज...